आणि मी आंघोळ केली व्यवस्थेच्या नावाने ……………….!
काल ( सोमवार दि . २७/०४/२०१५ )सकाळी जंगमहट्टी फाट्यावरून मला फोन आला . शाहू कांबळे नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता . पेपरमधली माझी मनोरुगणांबद्दलची बातमी त्यांनी वाचली होती आणि माझा फोन नंबरहि त्यांनी तिथून मिळवला होता . त्यांनी तिच्यासोबत काहीतरी वाईट घडले असल्याबद्दल मला सांगितले . कारण ती याविषयावर बडबड करत होती ; कुठल्याही पुरुषाला ती जवळ येवू देत नव्हती . मी इथून निघताना तिच्याशी संवाद करण्यासाठी इथून क्रांती कांबळे ह्या सोशल वर्करला माझ्या बरोबर घेतले ; आणि चंदगडमधल्या समाजसेविका विद्या तावडे यांनाही फोन करून त्या जागेवर येण्यासाठी सांगितले . आणि मी तडक त्या जाग्यावर पोहोचलो . तोपर्यंत शिरगुप्पे सरांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी डॉक्टरांना फोन करून सांगितले होते .
मी पाटणेफाटा इथून जंगमहट्टी फाट्यावर पोहोचेपर्यंत जवळपास दीड तास लागला . तोपर्यंत शाहू कांबळे माझी वाट बघत तिथे तिच्यावर नजर ठेऊन उभे होते . मी तिथे गेल्याबरोबर त्या १८-२२ वयोगटातल्या महिलेने मला शिवी हासडली ! ' तू मेरे साथ *** करने आया ही क्या ? ***** ' मला अशा प्रसंगांचा अनुभव आहे . त्यामुळे मी काही चिडलो नाही . माझ्याबरोबर आलेल्या क्रांतीला मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर असे सांगितले . पण क्रांतीलाही ती जवळ येवू देईना . मग १०-१५ मिनिटांत तिथे विद्याताई तावडे आल्या . त्यांनी तिच्याशी हळूहळू लांबूनच संवाद करत जवळ जायला सुरुवात केली त्यांच्या हातात भजी पाव बघून ' तू मेरेकू खाना लायी ?' अश्या प्रकारचा प्रश्न तिने विचारला . विद्याताइंच्या जवळ जाण्याने ती बिथरली नाही त्यामुळे मला बरे वाटले . मग तिला आज-याकडे घेऊन येण्यासाठी अम्बुलन्सच्या शोधात फोन करू लागलो . १०८ च्या अम्बुलन्सला फोन करून वस्तुस्थिती सांगून येण्याविषयी विनवले . भावनेला का मूल्यांना महत्त्व द्यायचे ते तुम्ही ठरावा असे मी डॉक्टर पराग जोशी यांना सांगितले . यावर त्यांनी आपण येतो आहोत असे सांगितले . मला अतिशय आनंद झाला . कारण इथून जर तिला खाजगी गाडीने न्यावे लागले असते तर जवळपास २००० रुपये लागले असते . आणि तेव्हढे रूपये माझ्याकडे नव्हते . ' मनोविकास ' वाल्यांनी शिरगुप्पे सरांकडे देण्यासाठी दिलेले १५०० रुपये सुद्धा मी खर्च करत होतो .
१५ मिनिटांमध्ये अम्बुलन्स आली . विद्याताईनी गोड बोलत तिला अम्बुलन्समध्ये चढवले ; त्या स्वतः तिच्यासोबत बसल्या . विद्याताई नसत्या तर तिच्याशी एकट्या क्रांतीला संवाद साधणे फारच कठीण गेले असते . विद्याताईंनी तिच्याशी अतिशय मनमोकळ्या चर्चा केल्या . या सर्व बोलण्यातून तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल आम्हांला कळले . ती हिंदी , कोकणी , कन्नड , आणि मराठी भाषा बोलत होती . तिने आपली हृदयद्रावक कहाणी कथन केली . आणि ते सर्व ऐकून आम्हाला काय वाटले ते मी व्यक्त करू शकत नाही . मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे प्रत्येक बेवारस मनोरुग्णाची एक वेगळी हृदयद्रावक कहाणी असते . ती ऐकून आपण खरच मुळापासून हालतो . आपण किती ' लकी ' आहोत हेही आपल्याला कळते . माझ्याकडे' हे' नाही 'ते' नाही म्हणून सतत रडणारे आपण 'आपल्याआतून बाहेर' कधीच पहात नाही , पडत नाही ! कित्येकदा अनेक बेवारस कुठेही मरून पडतात ; त्याचे कुणालाही देणे-घेणे असत नाही . पण अशा मृतदेहांचा पंचनामा करण्यासाठी पोलिस पोहोचतात वक्तशीर !
अम्बुलंस आज-यात सायंकाळी ४ वाजता पोहोचली . तिला आम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो . रीतसर सर्व सह्या केल्यानंतर मी डॉ . पराग जोशींचे आभार मानण्यासाठी गेलो असता त्यांनी माझ्याकडे ५०० रुपये मागितले ……! मी काहीच विचार केला नाही . कारण डॉक्टर म्हणाले होते कि पेशंट सिरियस नसल्यामुळे आम्ही नेऊ शकत नाही ; तरीही तुमच्यासाठी म्हणून आम्ही येत आहोत . मी म्हटले जाऊ द्या ; दुस-या गाडीला भाड्याने बोलावले असते तर २००० रुपये पडलेच असते !
हॉस्पिटलमध्ये आणल्या आणल्या तिथल्या सिस्टरांनी डॉक्टरांना फोन लावला . डॉक्टरांनी दाखल करून घ्यायल्या सांगूनसुद्धा सिस्टर त्यांना सांगत होत्या कि ' हे आम्हांला जमणार नाही , असे पेशंट आमचे ऐकत नाहीत ' वगैरे वगैरे ! सिस्टरांनी तरीही माझ्यासाठी खूप बोलणी वापरली कि ' हा वेड्यांचा दवाखाना नाही वगैरे … पण शेवटी चिडून मी म्हटले कि ' अंगावर झुरळ पडल्यासारख्या वागू नका ; हि स्त्री कुठल्या प्रसंगातून गेली आहे हे तरी जाणा !' पण त्यांच्यावर ह्या शब्दांचा काहीएक परिणाम झाला नाही . शेवटी मी जोरात त्यांना सांगितलं कि 'मी थांबतो , बस्स ! ' . यानंतर डॉ . फर्नांडीस यांच्याशी चर्चा करून विद्याताई जायला निघाल्या . त्यांना त्यांच्या पाटणे फाट्याजवळच्या गावी सोडणे गरजेचे होते . कारण त्यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली होती . त्यांची हि मदत मी विसरू शकत नाही ! बबलू शेख नावाच्या माझ्या मित्राला मी त्यांना सोडून यायला सांगितले . तो गेला .
यानंतर सायराला ( तिने सांगितलेले नाव ) शांत करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला पण तिचे वागणे जास्तच हिंसक होत चालले होते . मग तिला चहातून आम्ही झोपेची गोळी दिली तरीसुद्धा ती झोपत नव्हती . मग मी तिला म्हटले कि, 'अगर तुम अपने भाई का नही सुनोगी तो मै जाता हुं यहां से ! ' असे म्हटल्यावर ती झोपली . पण थोड्याच वेळासाठी . क्रांतीला तिच्या घरी सोडून येईपर्यंत तिने सायराने तिला झोपवलेल्या खोलीची काच फोडली होती . हॉस्पिटलवाल्यांनी एवढ्या गोष्टीवरून मला बोलणं लावलंच ! मला हॉस्पिटलवाल्यांनी फोन करून सांगितले कि ' जर तुम्ही १५ मिनिटांत इथे नाही आलात तर आम्ही पोलिसांना फोन करू ' . मी त्यांना चिडून सांगितले कि , ' तुम्ही कराच फोन ! ' आणि मी तडक पोलिस स्टेशनमध्ये आलो . पोलिस निरीक्षकांना मी म्हटले कि , ज्यावेळी अशा प्रकरणात कुणीतरी मदत करायला धावतो त्याच्या तुम्ही कायदेशीर गोच्या करून त्याला बोलता . त्यावर त्यांनी कायदेशीर बाब आहे , चंदगड हद्दीतला पेशंट आहे , तुमच्या भल्याचच आम्ही बोलतो आहोत वगैरे दिलसे दिले ! मला खरोखर तिच्यावर उपचार होण्याआधीच ह्या सर्व बाबींचा ' कायदेशीर ' उलगडा करण्याची मानसिकता पटली नाही . ' प्रथम उपचार मग पंचनामा ' असे काहीच होत नाही . प्रथम पंचनामा आणि त्यांच्या आवश्यक त्या बाबींची व हद्दींची चौकशी झाल्याशिवाय उपचार नाही हि पद्धत योग्य नाही . मला कुणीच सहकार्य करायला तयारनव्हते . मी रूमवर आलो आणि अंगावर थंडगार पाण्याची बदली ओतून घेतली !
तिला कर्जतला ' श्रद्धा ' मध्ये पाठवणार आहोत . त्यासंबधीची बोलणी पूर्ण झाली आहे . शुक्रवारी 'श्रद्धा ' चे स्वयंसेवक येणार आहेत . ते येण्यापूर्वी सायराच्या व आणखी एका - दोघांच्या जाण्याच्या व्यवस्थेसाठी अम्बुलंस व खर्चाचे १५००० रुपये जमा करण्यासाठी आम्ही सुरुवात केली आहे .
सायरा आजरा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच बसलेली आहे . सकाळी जेवायला गेलो तेव्हाही तिने मला शिवी हासडलीच ! पण तिची शिवी मला तिच्याबद्दल आणखी आपुलकी निर्माण करते आहे !
------------------------------------------------------------------------------------------------------------
अमित प्रभा वसंत
८००७४१५५६७